उपक्रम‌

काँपीमुक्ती रँली

जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालमध्ये काँपीमुक्ती जनजागृती रँली काढ‌ण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यानी रँलीत सहभागी होउन काँपीमुक्तीच्या घोषणा देत गावातुन मिरवणुक काढली.विद्यार्थ्यानी हातात काँपीमुक्तीचे फलक घेतले होते.

राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीर

आष्टी तालुक्यातील सुलेमानदेवळा येथे संस्थेचा राष्ट्रीय‌ सेवा योजना हिवाळी शिबीर समारोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. पाच दिवसीय हिवाळी शिबीरामध्ये मुलांनी ग्रामदैवत सुलेमान बाबा,खंडोबा मंदिर,परिसर सह गावात ग्रामस्वच्छता करुन पर्यावरण संर‌क्षण, आधुनिक शेती, स्वच्छतेतुन समृध्दीकडे राष्ट्रीय एकात्मता,एड्स एक समस्या आदी विषयावर जनजागृती केली.

पालक मेळावा

बदलत्या काळात पालकांनी आपल्या पाल्याकडे जातीने ल‌क्ष देउन शिक्षकांशी समन्वय साधावा या उद्देशाने संस्थेच्या कनिष्ठ,उच्च आणि माध्यमिक विद्यालयामध्ये दरवर्षी पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते.

सामुहिक र‌क्षाबंधन

बहीण भावाच्या पवित्र प्रेमाची महती सांगणारा हा सण राखीच्या धाग्याने बहिण भावाच्या नात्याचे बंधन पक्के बांधण्यात येतात.पौराणिक आख्यामिकांचा आधार घेत मान्यवरांनी र‌क्षाबंधनाचे महत्व विषद केले.तसेच अनेक विद्यार्थी विद्यार्थीनींनी र‌क्षाबंधनाचे महत्व विषद करणाऱ्या कविता विषद केल्या.सर्व विद्यार्थीनींनी मोठ्या श्रध्देने विद्यार्थी व प्राध्यापकांना राख्या बांधल्या.

गरिबांना शिक्षण

गरिब कुटुंबातील होतकरु विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नयेत म्हणुन त्यांच्या शिक्षणासाठी पुर्ण युनिफाँर्म,पुस्तके, वह्या चा खर्च संस्थेतर्फे करायची सोय उपलब्ध केली असुन शैक्षणिक फी आकारली जात नाही. संस्था भारत निर्माण कार्यक्रम देखील उत्कृष्ट पध्दतीने राबवत आहे.

वार्षिक स्‍नेहसंमेलन

मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी स्‍नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम, वार्षिक पारितोषिक वितरण इ. समावेश असतो.

 

मुख्यपान |‌ आमच्याविषयी‌ | उपक्रम‌ | प्रमाणपत्रे‌ | वार्षिक अहवाल‌‌ | वृत्तपत्रे कात्रण‌‌ | देणगी |‌ गँलरी |‌ संपर्क |‌‌